fbpx

मान्सून 23 मेपर्यंत धडकणार अंदमानात

नवी दिल्ली – पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा 23 मेपर्यंत मान्सून अंदमानात धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.मान्सून 23 मेपर्यंत अंदमानात प्रवेश करेल तर 29 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार असल्याची शुभवार्ता भारतीय हवामान खात्यानं वर्तवलीये

दरम्यान या आधी स्कायमेट या खासगी संस्थेनं देखील मान्सून केरळात 28 मे पर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.यावर्षी देशात सरासरीएवढा पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं वर्तवलाय. जूनमध्ये सरासरीच्या 111 टक्के पाऊस पडेल. जुलै आणि ऑगस्टमध्ये पाऊस थोडा कमी होईल, आणि सप्टेंबरमध्ये पुन्हा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. एकूणच खरिपाचा हंगाम चांगला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

2 Comments

Click here to post a comment