मुंबई : मान्सूनचा प्रवास आता आणखी थोडा पुढे सरकला आहे. मान्सून आता अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग आणि संपूर्ण कोकण परिसरात पोचला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि परिसरात आज मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि कर्नाटकाच्या काही भागातही मान्सून पुढे सरकल्याने चित्र आहे. तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागातही काल मान्सून दाखल झाला आहे. पुढील दोन दिवसात मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि तमिळनाडू तसंच विदर्भ आणि तेलंगणच्या काही भागात पोचणार आहे.
पुढच्या पाच दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू, पाँडिचेरी भागात येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<