अखेर पुण्यात मान्सून दाखल!

पुण्यामध्ये पावसाला दमदार सुरुवात

पुणे: मान्सूनला सुरुवात होऊनही पुणे आणि परिसारत पावसाची गैरहजारी होती. आज दुपारच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारी ३ च्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात सुरुवात झाली. दरम्यान अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची मात्र धावपळ झाल्याच दिसून आलं.

bagdure

पुणेकर बऱ्याच दिवसापासून दमदार पावसाची वाट पाहत होते. जून महिना संपत आला तरी पावसाने शहरात हजेरी लावली नव्हती. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रातील पाण्याची स्थिती खालावली आहे. शहराला दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा या धरणांमध्ये अाहे. त्यामुळे जून महिन्यात पाऊस न झाल्यास पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट येणार होते. मात्र आज अचानक सुरु झालेल्या पावसाने पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

You might also like
Comments
Loading...