मुंबई : हवामान खात्याने (IMD) जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे स्वरूप बदलण्याची शक्यता वर्तवली आहे. शनिवारपासून महाराष्ट्रात मान्सून वाढणार आहे. (Monsoon in Maharashtra) कोकणात शनिवारी मुसळधार आणि सोमवारपासून अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातून महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आता गुजरातच्या दिशेने कूच करत आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून मान्सूनने निराशा केली आहे. सक्रिय होऊनही पाऊस झालेला नाही. मात्र शनिवारपासून मुंबईसह महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Rain in Maharashtra) हवामान खात्याने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय सिंधुदुर्गात 18 ते 21 जून आणि रत्नागिरीत 20 ते 21 जून दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
18 Jun,आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून,काही ठिकाणी मध्यम ते जोरधार पावसाची शक्यता तसेच म.महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भातही
द.कोकणात सोमवार पासून अतीमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई ठाण्यासह उ.कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Latest Satellite obs confirms status now pic.twitter.com/jqjgKYsiq0— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 18, 2022
मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावल्याचा दावा हवामान खात्याने केला असला तरी मराठवाड्यात मात्र दुष्काळाचे सावट कायम आहे. एवढेच नाही तर आर्द्रतेमुळे लोक प्रचंड नाराज झाले आहेत. या भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पावसाने हजेरी लावलेली नाही. पण हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आता मान्सून मराठवाड्यातही जोरदार बरसणार आहे. सोमवारपासून मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :