विदर्भात मान्सून दाखल; पुढील ४ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

vidarbh

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे राज्यात पुढील काही दिवस पावसाचे असणार आहेत. येत्या 9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान आज सकाळपासून मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले आहे. मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात आजपासून म्हणजेच, 9 जून ते 13 जून दरम्यान, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान आता विदर्भात मान्सून दाखल झाला आहे. मान्सून दाखल होताच पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबतच एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग हा ताशी 30-40 किमी प्रति तास इतका असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यात विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणीतही मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP