आनंदाची बातमी! मान्सून केरळमध्ये दाखल

blank

मुंबई : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीय. केरळात तीन दिवस आधीच पावसाचं आगमन झालंय. महाराष्ट्रात 7 जूनला मान्सून प्रवेश करणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने यावर्षी पाऊस सामान्य रहाणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: 42 टक्के असेल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे. तर पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.