मान्सून कोकणात दाखल,दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात बरसणार

blank

टीम महाराष्ट्र देशा- आभाळ कधी भरुन येतंय यासाठी गेले प्रदीर्घ काळ आकाशाकडे डोळे लाऊन बसलेल्या महाराष्ट्रातील तमाम जनता आणि शेतकऱ्यासाठी खुशखबर आहे. येणार येणार अशी चर्चा असलेला मान्सून अखेर दक्षिण कोकण प्रांतात दाखल झाला आहे. हाच मान्सून पुढे सरकत येत्या तीन ते चार दिवसांमध्ये राजधानी मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

वायू चक्रीवादळामुळे मान्सूनला अडथळा निर्माण झाला होता. आता वायू वादळाचे संकट दूर झाल्याने मान्सून सक्रीय झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची प्रतीक्षा होती. १२ ते १४ जूनच्या दरम्यान मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला मात्र तोही खरा ठरला नाही. त्यानंतर २१जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे हा अंदाज खरा ठरला आहे. मान्सून दाखल झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसात मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस पडण्यास सुरूवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.