मृत सहकाऱ्यासाठी ‘त्यांचा’ ठिय्या

monkey kokan death

सिंधुदुर्गनगरी : मालवण धुरीवाडा येथे वाहनाच्या धडकेत माकडाचे पिल्लू मृत्युमुखी पडले. पण रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या माकडाच्या पिल्लाला हलविताना पालिका सफाई कामगारांवर इतर माकडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अखेर स्वच्छता मुकादम रमेश कोकरे यांनी माकडांच्या नकळत त्या मृत माकडाला कचरा गाडीत ठेवले तरी बराच काळ ती माकड आपल्या सहकाऱ्यासाठी तिथेच रेंगाळत होती.

Loading...

मालवण टोपीवाला हायस्कुल-कोळंब मार्गावरील कन्याशाळेसमोर रस्ता ओलांडत असलेल्या माकडांच्या कळपातलं एक छोट माकड रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडले. त्यानंतर कळपातल्या इतर माकडांनी त्याठिकाणी एकच हैदोस घातला आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांच्या अंगावर हल्ला करण्याच्या उद्देशाने धावून येऊ लागले.

monkey death

नगरसेवक यतीन खोत यांनी याबाबत नगरपालिका आणि वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. काही वेळाने त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसह पोहचलेल्या नगरपालिकेचे स्वच्छता मुकादम रमेश कोकरे यांनी मृत माकडाला कचरा गाडीत ठेवण्यासाठी पुढे सरसावताच इतर माकडांनी हिंस्त्र होत या सर्वांच्या अंगावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या वेळी उपस्थितांमध्ये पळापळ झाली. नंतर कचरा गाडीचा आडोसा घेत कोकरे आणि त्यांचे सहकारी धीर करून पुढे सरसावले आणि त्या मृत माकडाला गाडीत ठेवण्यात यशस्वी ठरले. पण आपला मृत सहकारी कुठे गेला, या चिंतेत ती माकड मात्र बराच वेळ तिथे रेंगाळत होती.Loading…


Loading…

Loading...