‘साडेचार वर्षे झोपा काढायच्या अन् निवडणुका जवळ आल्या की जागे व्हायचे’, राजळेंचा घणाघात

monika rajale- pratap dhakane

अहमदनगर : राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांनी भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्हीही नेते एकमेकांवर टीका किर्ण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतेच प्रताप ढाकणे यांनी मोनिका राजळे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या कामाचाही जाब विचारला होता. इतका निधी आणला मग गेला कुठे. तुम्हाला सल्लागार बदलण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले होते. ढाकणे यांच्या टीकेला आमदार राजळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आता प्रताप ढाकणे यांच्या टीकेला मोनिका राजळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘तुम्ही एक कोविड सेंटर सुरू केलं, त्याचाच गावभर प्रचार करता. तुम्हाला कारखान्याशेजारचा रस्ता करता आला नाही. बाकीचं कशाला सांगता. मी केलेला विकास पाहायचा असेल तर दोन्ही तालुक्यात फिरून दाखवते. साडेचार वर्षे झोप काढायची आणि निवडणुका जवळ आल्या की जागे व्हायचे, अशा शब्दांत मोनिका राजळे यांनी ढाकणेंचा जोरदार समाचार घेतला आहे.

‘मी सहा-सात वर्षांपासून कोणावरही टीका न करता काम करण्याला प्राधान्य दिले. ज्यांनी मला पदावर बसवले त्यांचाच मी विचार करते. इतरांचा विचार मी करत नाही. मी कधी कोणावर टीका केली नाही. तुम्ही मात्र कोविड सेंटर उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह माझ्यावर टीका केली. आज सुरू केलेली कामे मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली आहेत’, असे देखील राजळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या