fbpx

स्व.राजीव राजळेंचा  विकासाचा वसा पुढे नेवू – आ.मोनिका राजळे 

पाथर्डी / निलेश नेव्हल : धावपळीच्या युगात सुखाचे सारथी अनेक लाभतात.हेच सातत्य दुःखाच्या प्रसंगात सुद्धा जनता जनार्धनाने ठेवले. त्यात खंड पडला नाही. त्यामुळे राजळे यांची कुटुंब व्यवस्था अजून विस्तारीत झाली आहे.स्व. राजाभाऊंच्या विकासाचा वसा व वारसा  पुढे नऊ ,असा विश्वास आमदार मोनिका ताई राजळे यांनी दिला.

सुसरे( पाथर्डी) येथ स्व माजी आमदार राजाभाऊ राजळे यांच्या संकल्पनेतील सुमारे 1कोटी52 लाख रुपये  किमतील विविध विकास कामांच्या शुभारंभा प्रसंगी त्या बोलत होत्या.

अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते बबनराव वीर हे होते.सभापती चंद्रकला खेडकर ,उपसभापती विष्णुपंत अकोलकर, भाजप तालुका अध्यक्ष माणिक ,काशीबाई गोल्हार जिल्हा परीषद सदस्य राहुल राजळे. पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हल ,भाजप बुतविस्तारक दिंनकर  गर्जे ,सरपंच दत्तात्रय कंठाली, उपसरपंच लताबाई उदागे छायाताई पवार आदी उपस्तीत होते.मुळा पाटचारी आवर्तनातही टेल टू हेड हि वितरण प्रणाली शेतीपूरक ठरत आहे.

शासनाची हि कार्यप्रणाली लोकमानास जपणारी आहे.निधीला साजेशी दर्जेदार कामे झाली पाहिजेत,अशी तंबी हि राजळे यांनी दिली.थाळी फेक क्रीडा स्पर्धेत यश मिळाल्याबद्दल प्रिया खरात हिचा सन्मान करण्यात आला.केशव यांनी प्रास्ताविक केले.