मनी लाँड्रिंग प्रकरणात भुजबळांना दिलासा; ६ सप्टेंबरपर्यंत अटक नाही

मुंबई : मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालाय. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रा प्रकरणी ६ सप्टेंबरपर्यंत भुजबळ यांच्यासह ३6 आरोपींना ६ सप्टेंबरपर्यंत वैयक्तिक हमीवर अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे. ६ सप्टेंबरला कोर्ट निकाल देणार आहे.

दरम्यान,  छगन भुजबळांना जसलोक हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे. भुजबळ यांची नाशिक येथील २५ कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. त्याच्या आधारे ईडीनं पीएमएलए कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करता येणार की नाही याविषयी पीएमएलए कोर्ट ६ सप्टेंबरला आपला निर्णय देणार आहे.