पुण्यात ढोल पथकातील महिलेचा विनयभंग

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

 पुणे :  मागील काही वर्षांपासून ढोल ताशा पथकांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्याप्रमाणावर वाढत असल्याचे पहायला मिळत होत मात्र पुण्यात घडलेल्या एका घटनेमुळे ढोल ताशा पथकातील महिला आणि मुली खरच सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे. पुण्यातील हडपसर येथील ढोल ताशा पथकातील महिला गटप्रमुखाचा पथकातीलच दोघांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्या महिलेच्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हड़पसर येथील काळेपडळ येथे रूद्रतेज प्रतिष्ठान या ढोलताशा पथक आहे.2015 पासून ती महिला सरावासाठी जात होती. त्या दरम्यान तिची ओळख कपिल गायकवाड, ओमकार मांगडे (दोघे ही रा. हडपसर) या दोघांशी झाली.तेव्हा त्या महिलेवर युवती नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली .आरोपीनी तक्रारदार महिलेस  वादनाच्या दरम्यान मनास लज्जा उत्पन्न होईल. अशा प्रकारचे कृत्य करून मानसिक त्रास दिला असून आरोपींनी तक्रारदार महिलेस वेळोवेळी व्हॉट्‌सऍपवर अश्लिल मेसेज टाकून खूनाची आणि बदनामी करण्याची धमकी दिली.तुझी बाहेर बदनाामी    करूअशा स्वरूपाच्या धमक्या देण्याात आल्या.
विशेष म्हणजे ही गंभीर बाब पथक प्रामुख्याच्या लक्षात आणून देखील त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.शेवटी मोठी हिम्मत करून या महिलेने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली . यानंतर कपिल गायकवाड, ओमकार मांगडे या दोघांना पोलिसांनी अटक केली अशा प्रकारे कोणी त्रास देत असेल तर महिलांनी पोलिसांबरोबर संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे .ढोल ताशा पथकातील महिलेच्या या विनयभंगाच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
You might also like
Comments
Loading...