चोर ते चोर वर शिरजोर.. !

चोरीची माहिती का दिली म्हणून विनयभंग

बीड:चोरी केल्याची माहिती पोलिसांना का दिली म्हणून एक महिलेचा विनयभंग करण्याची घटना केज तालुक्यात नांदूरघाट येथे घडली.एका चोरी प्रकरणात पोलिसाना एका महिलेने माहिती दिली. आपले बिंग या महिलेमुळे फुटणार याचा राग येवून दाद्या शिंदे ,बब्रुवान शिंदे ,चिव्या शिंदे आणि पप्पन्या शिंदे या चार जणांनी या महिलेला दमदाटी करत तिचा विनयभंग केला. या संदर्भात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. करण्यात आला आहे.