स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिका पूर्ण करणारच – डॉ.अमोल कोल्हे

dr amol kolhe

टीम महाराष्ट्र देशा : झी मराठी या वाहिनीवर सुरु असलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी राजे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आणि या मालिकेतून छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे हे राज्याच्या घराघरात पोहचले आहेत. अशातच अमोल कोल्हे हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार असल्याच्या बातम्या आल्याने प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

मात्र, संभाजी राजेंची भूमिका साकारणार असून मालिका पूर्ण झाल्यानंतर मालिका विश्वातून काही काळासाठी निवृत्ती घेणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे. मालेगाव येथे सयाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात अमोल कोल्हे बोलत होते.

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी हातातील शिवबंधन धागा तोडत हातात घड्याळ घालत , शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करून शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्या पार्श्वभूमीवरच त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचा अंदाज लावला जात आहे.