मोक्षदा मॅडम, अधिकाऱ्यांवर जरा लक्ष ठेवा, एसीबीने पीएसआयला ओढले जाळ्यात

औरंगाबाद : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे नुकतेच कौतुक केले होते. मात्र पाटील यांचा आपल्याच अधिकाऱ्यावर वचक राहिला नाही का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पिशोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांना २० हजार रुपये लाचेची मागणी करताना अटक केली आहे.

याविषयी माहिती अशी कि, पिशोर पोलिस स्टेशन मध्ये पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला असून न्यायालयाने तपासीक अधिकारी यांना आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्या बाजूने चांगले म्हणणे मांडण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यामुळे तक्रार दाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केली असता पिशोर पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेले रणजित गंगाधर कासले यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काहींच्या मते पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. असे असले तरी मागील काही दिवसापासून औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात मोठ्या प्रमाणात अनेक खात्याला अशोभनीय अशा घटना घडल्या आहे. ग्रामीण हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना देखील उत आला आहे. यामुळे कडक आणि शिस्तबद्ध असलेल्या मोक्षदा पाटील यांच्या कामाकडे दुर्लक्ष होतंय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या