मोहम्मद शमीच्या गाडीला अपघात, डोक्याला पडले दहा टाके

टीम महाराष्ट्र देशा- टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कार अपघातात जखमी झाला. त्याच्या डोक्याला दहा टाके पडले आहेत. देहरादूनहून दिल्लीला जाताना हा अपघात झाला. शमीच्या कारला एका ट्रकने धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट अकादमीच्या कामासाठी मोहम्मद शमी देहराडूनमध्ये होता. तेथून आज पहाटे तो दिल्लीला परतत असताना रस्त्यात एका भरधाव ट्रकने शमीच्या कारला धडक दिली. या अपघातात शमीच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला दहा टाके पडले आहेत.

हसीन जहाने आरोप केल्यानंतर बीसीसीआयने शमीचा कॉन्ट्रॅक्टमध्येही समावेश केला नव्हता. मात्र, नंतर बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने शमीला क्लीनचिट दिल्यानंतर त्याचा पुन्हा कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आला.