मनसे आणि भाजप या पक्षांनी राज्यातील मशिदींवरील अनधिकृत भोंगे कडून टाकण्याची मागणी पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारकडे केली होती. जर हे भोंगे उतरवले गेले नाहीत तर आम्ही मशिदींसमोरच दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशाराही देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आता सर्वच धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी अधिकृत परवानगी घ्यावी लागणार असल्याचे जाहीर केले,
त्यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया देत या निर्णयाचे स्वागत केलं आहे.