पुण्यात कॉंग्रेसचा उमेदवार ठरला, प्रवीण गायकवाडांना ठेंगा तर मोहन जोशींना संधी

पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अखेर कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, पक्षाचे जेष्ठ आणि निष्टावंत नेते मानले जाणारे माजी आ मोहन जोशी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर दोन दिवसांपूर्वी उमेदवारी मिळण्याच्या आशेने कॉंग्रेस प्रवेश करणारे प्रवीण गायकवाड यांना डच्चू देण्यात आला आहे.

Loading...

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस उरलेले असताना देखील पुण्यासाठी कॉंग्रेस उमेदवारी घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, सुरेखा पुणेकर, नगरसेवक अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांची नावे उमेदवारीसाठी शेवटपर्यंत चर्चेत होती. यामध्ये गायकवाड यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र पक्षातील जुन्या नेत्याला संधी देण्याची भूमिका पक्ष नेतृत्वाने घेतल्याचं दिसत आहे.

दरम्यान, पुणे लोकसभेसाठी आता भाजपचे गिरीश बापट तर कॉंग्रेसचे मोहन जोशी असा सामना रंगणार आहे. तर जोशी यांना उमेदवारी देण्यात आल्याने प्रवीण गायकवाड समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गायकवाड हे तगडी लढत देवू शकत असताना देखील कॉंग्रेसकडून डावलण्यात आल्याने पुणे शहरात वेगवेगळ्या चर्चा उधान आले आहे.

कोण आहेत मोहन जोशी
सुरुवातीला पुण्यातील स्थानिक मराठी वृत्तपत्रात पत्रकार म्हणून नौकरी

आपल्या लेखणीतून सामन्यांना न्याय देण्यासाठी काम केल्याने कॉंग्रेस नेत्यांनी पक्षात घेतले

१९७२ – ७३ मध्ये युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून काम

१९९८ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रदीप रावत यांच्याकडून पराभव

२००५ साली महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस म्हणून नियुक्ती

२००८ साली विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड

 

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...