मोहन डेलकर यांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मधून समोर आले मृत्यूचे कारण

mohan delkar

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. मरिन ड्राईव्ह परिसरातल्या ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये आत्महत्या केली. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर मुंबईत मृतावस्थेत आढळले. मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला होता.

मोहन डेलकर हे तब्बल सात वेळा दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. १९८९ मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र २०१९ मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.

डेलकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.मोहन डेलकर यांच्या पश्चात पत्नी कलाबेन डेलकर आणि दोन मुले अभिनव व दिविता असा परिवार आहे.

दरम्यान,शवविच्छेदन अहवालाच्या पहिल्या तपासणीत मृत्यूचे कारण घशातून श्वास घेण्यासाठी आलेला अडथळा अर्थात श्वास घेता न आल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तथापि, फॉरेन्सिक अहवाल समोर आल्यावर मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे स्पष्ट होईल.डेलकर राहत असलेल्या खोलीतून पोलिसांनी गुजराती भाषेत लिहिलेली एक आत्महत्या नोटही मिळालेली आहे.

महत्वाच्या बातम्या