‘द कश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतर मोहन भागवतांची प्रतिक्रिया…

मुंबई : ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरुन दोन गट पडलेले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणजेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी या चित्रपटावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवन यांनी ज्या लोकांना सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे किंवा ज्यांना सत्याची भूक आहे त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट नक्की पहावा, असं म्हटलंय. १९९० मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर झालेले हल्ला आणि त्यानंतर त्यांना काश्मीरमधून करावं लागलेलं पलायन या कथानकावर हा चित्रपट आधारित आहे.

सध्या या चित्रपटाचे समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले आहेत. मोहन भागवत यांनी चित्रपटाचे निर्देशक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी तसेच चित्रपटाची अभिनेत्री पल्लवी जोशी यांची भेट घेतलीय. या भेटी दरम्यान मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं. चित्रपटासाठी मोहन भागवत यांनी विवेक अग्निहोत्रींना शुभेच्छा देताना, “सत्याच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. या चित्रपटामधील संवाद उत्तम आहे. त्यामधून पूर्ण कलात्मकता दिसते. यासाठी बरंच संशोधन करण्यात आलंय. त्यामुळेच सत्य काय आहे याची जाण ज्यांना आहे त्यांनी हा चित्रपट आवश्यक पाहिला पाहिजे,” असं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या :