अपघातातून थोडक्यात बचावले सरसंघचालक

bhagvat

वेब टीम :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक  मोहन भागवत हे एका अपघातातून थोडक्यात बचावले .भागवत यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीचा टायर फुटल्याने ताफ्यातील इतर गाड्यांची आपापसात टक्कर झाली.यमुना एक्सप्रेस वे वरील सुरीर ठाण्याच्या भागात ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात मोहन भागवत थोडक्यात बचावले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  मोहन भागवत वृन्दावन मधील  पानीघाट स्थित निकुंज वन आश्रमामध्ये  संत विजय कौशल महाराजांच्या इथे ध्यान केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला निघाले असताना हा अपघात झाला .गाडीचं  नुकसान वगळता कोणालाही कसलीही इजा न झाल्याने सरसंघचालक पुढील प्रवासासाठी रवाना झाले आहेत.