मोहन भागवत परदेशी माध्यमांशी साधणार संवाद , पाकिस्तान मिडियाला आमंत्रण नाही

mohan bhagavat on raygad

टीम महाराष्ट्र देशा:- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पुढच्या महिन्यात परदेशी माध्यमांशी संवाद साधणार आहेत.यावेळी ते परदेशी माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. त्याचबरोबर, आरएसएस आणि त्याच्या विचारधारेबद्दल पसरलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. मोहन भागवत हे प्रथमच परदेशी माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

आरएसएस मधील एका पद अधिकाऱ्यांने सांगितले की या संदर्भात विविध देशामधील ७० परदेशी मीडिया संस्थांना निमंत्रण पाठवली जात आहेत.मात्र पाकिस्तान मधील माध्यमांना कॉल केले जाणार नाहीत . आरएसएस मधील पद अधिकाऱ्यांचा म्हणण्यानुसार मीडिया परिषदेचा उद्देश विविध विषयांवर आरएसएसच्या विचारसरणीवर चर्चा करणे तसेच, आरएसएस आणि त्याची विचारसरणी याबद्दल पसरलेला गैरसमज दूर करणे हा आहे.

आरएसएसच्या आणखी एका पद अधिकाऱ्यांने असे सांगितले की, मोहन भागवत यांनी परदेशी माध्यमांना दिलेली माहिती ऑफ कॅमेरा असेल आणि कोणताही अहवाल दिला जाणार नाही.याचा अर्थ असा की मोहन भागवत यांचे परदेशी माध्यमांवरील संभाषण रेकॉर्ड केले जाणार नाही.

ही बैठक दिल्लीतील आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात होणार आहे. मोहन भागवत यांच्या तीन दिवसीय भाषणानंतर एका वर्षानंतर परदेशी माध्यमांसमोर ही बैठक होणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भागवत यांची भाषणे झाली होती. त्यात भारतीय  माध्यमांनी भाग घेतला. तथापि, आंतरराष्ट्रीय माध्यमांना मोठ्या प्रमाणात दूर ठेवण्यात आले होते.