कत्तलखान्यात गायी नेणारे हिंदू ठेकेदारच – मोहन भागवत

टीम महाराष्ट्र देशा : ‘गोपालन केल्याने कैद्यांमध्ये वेगाने सुधारणा होते. त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होते. तुरुंगाधिकाऱ्यांनीच मला हा अनुभव सांगितला, असं सांगतानाच समाज जागृत झाला तर कोणीही गाय कापायला पाठवणार नाही. आज हिंदूच गाय कापायला पाठवतात. अनेक ठेकेदार हिंदूच आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक कुटुंब गोपालक झालं पाहिजे. तरच गोपालनाच्या समस्येचं निराकरण होईल, असं पुण्यात गोसेवा पुरस्कार समारंभाला संबोधित करताना मोहन भागवत यांनी म्हटल आहे.

ते म्हणाले, “तुरुंगात गोपालन केल्याने गोसेवा करणाऱ्या कैद्यांच्या गुन्हेगारी मानसिकतेत घट होते. त्यामुळे गोपालन केलं पाहिजे, गाय कापली जाते, ही खरी समस्या नाही. तर गायीला माता मानत असूनही कोणीही गाय पाळायला तयार नाही, हे समस्येचे खरे मूळ आहे, असं सांगतानाच देशात केवळ ४५ हजार गायी शिल्लक आहेत. मात्र, त्यांना कसे जगवायचे हाच खरा प्रश्न आहे? आपण केवळ दुधासाठी गाय पाळत नाही. गाय, गोमूत्र आणि शेण या माध्यमातून सभोवतालचं पावित्र्य राखले जाते. मात्र, सध्या गोसंवर्धनाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करायला पाहिजेत असं आवाहन त्यांनी केले.

Loading...

या आधी भागवत यांनी हैदराबाद बलात्कार आणि खूनाच्या प्रकरणावरून स्त्रियांच्या सुरक्षेबाबत वक्तव्य केलं होतं. सर्वच गोष्टी सरकारवर सोडून चालणार नाहीत. तर मुलांना घरातूनच चांगली शिकवणूक मिळायला हवी. स्त्रियांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलायला हवा, असं भागवत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...