fbpx

केवळ दलितांच्या घरी जेवायला जाऊन काहीही होणार नाही : मोहन भागवत

Yogi maharaj

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दलितांच्या घरी जाण्याच्या सूचना केल्यानंतर भाजपाचे अनेक खासदार दलितांच्या घरी जेवायला जाऊ लागले. मात्र संघाने याच मुद्द्यावरून भाजप नेत्यांना फटकारले आहे. केवळ दलितांच्या घरी जाऊन काहीही होणार नाही. दलितांचंही आपण आपल्या घरी स्वागत करायला हवं, असं सरसंघचालक मोहन भागवतांनी म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या मंत्री, खासदार, मुख्यमंत्र्यांना दलितांच्या घरी जाऊन त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला दिला होता.भाजपच्या काही नेत्यांनी ज्याप्रकारे दलितांच्या घरी जेवण करण्याच्या नावावर स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यावर संघाचे नेते नाराज आहेत. असं करु नका, जे प्रामाणिक आणि खरं वाटेल तेच करा, असा सल्लाही भागवत यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत ?
‘आपण अष्टमीला दलित समाजातील मुलींना घरी बोलावतो. त्यांची पूजा करतो. मात्र आपण आपल्या मुलींना दलितांच्या घरी पाठवतो का? ‘ज्यावेळी दोन्ही बाजूंनी पुढाकार घेतला जाईल, तेव्हाच समरसता अभियान यशस्वी होईल. त्यामुळे केवळ दलितांच्या घरी जाऊन काहीही होणार नाही. दलितांचंही आपण आपल्या घरी स्वागत करायला हवं