fbpx

मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला गायीला वाचवताना अपघात

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला गुरूवारी अपघात झाला. हा अपघात चंद्रपुर-नागपुर महार्मागवर वरोराजवळ सायंकाळी ५.१५ च्या सुमारास झाला. या अपघातात त्यांचे चार सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

गायीला वाचवताना हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली.यावेळी झेड सुरक्षा असलेले मोहन भागवत नागपुरला जात असताना ताफ्यातील एका कारसमोर गाय आली. गायीला वाचवण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक लावला. यातच टायर फाटला आणि अपघात झाला.