#RSSTritiyaVarsh : प्रणव मुखर्जी याना आम्ही निमंत्रण दिलं यावर वाद का ? :भागवत

नागपूर : संघ नेहमीच समाजातील सदगृहस्थाना बोलवत असतो. प्रणव मुखर्जी याना आम्ही निमंत्रण दिलं यावर वाद घालणे तसेच संघाने मुखार्जीना का बोलावलं हा प्रश्न निरर्थक आहे असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. डॉ.हेगडेवार हे कॉंग्रेसच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होते तसेच हेगडेवार यांनी दोन वेळा कारावास भोगला असा दावा देखील भागवत यांनी केला.

मोहन भागवत यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
– डॉ.हेगडेवार हे कॉंग्रेसच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होते तसेच हेगडेवार यांनी दोन वेळा कारावास भोगला असा दावा देखील भागवत यांनी केला.
– केवळ हिंदूच नाही, सर्व समाजाला संघटित करण्याचं संघाचं काम, भारतात जन्मलेला प्रत्येक जण भारताचा सुपुत्र .
– संघाच्या परंपरेला अनुसरुनच प्रणव मुखर्जींसारख्या सदगृहस्थांना निमंत्रण, देशभरातील चर्चा निरर्थक.
– संघ फक्त हिंदूंसाठी नसून सर्व समाजासाठी आहे.
– सरकार खूप काही करू शकत मात्र सरकार सर्वकाही करू शकत नाही.
– हेगडेवार यांनी दोन वेळा कारावास भोगला.

– आम्ही कुणाचाही विरोध करत नाही. ज्याना संघ जाणून घ्यायचा असेल त्यांनी यावं आम्ही स्वागत करू.

तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्व असतं. नागपुरात 14 मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 800 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले होते.

तत्पूर्वी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपुरातील रेशीम बाग या ठिकाणी असलेल्या स्मृती मंदिराला भेट दिली. या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचे स्वागत केले.प्रणव मुखर्जींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या परिवाराला जोरदार झटका दिला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांना अभिवादन केलं. हेडगेवार हे भारतमातेचे सुपुत्र आहेत आहेत अशी प्रशंसा प्रणव मुखर्जी यांनी केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. स्मृती मंदिर या ठिकाणी असलेल्या नोंदवहीत त्यांनी ही नोंद केली.