मोहन भागवत म्हणजे ‘झुटा आदमी’- प्रकाश आंबेडकर

पुणे: राष्ट्र उभारणीसाठी आम्हाला सगळा समाज एकत्र करायचा आहे. राजकारणात ‘मुक्त’ची भाषा चालते, आम्ही संघात अशी भाषा मुळीच करत नाही. आमचे विरोधकही राष्ट्रबांधणीचे सहप्रवाशी असल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यामध्ये बोलताना केले होते. मात्र भागवत म्हणजे झुटा आदमी आहेत म्हणत, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भागवत यांच्यावर टीका केली आहे. तसेच आम्ही मुक्तीची भाषा करत नाही म्हणणारे संघाचे लोक गावागावामध्ये एका हातात भगवा आणि एका हातात निळा गुलाल घेऊन फिरतात आणि ‘भगवा हवा की निळाची’ भाषा बोलतात अशी टीकाही आंबेडकर यांनी यावेळी केली.

bagdure

दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट झाल्याप्रकरणी दलित संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली असून या बंदला हिंसक वळण लागले आहे. आज जो भडका उडाला आहे त्याला सुप्रीम कोर्ट आणि शासनच जबाबदार असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला आहे.

सामान्य जनतेला विचारात न घेता निर्णय घेतल्यामुळे आज हे सर्व घडत आहे. देशात सीरिया सारखं वातावरण निर्माण होत असून देशात आज काही ठिकाणी हिंसाचार झाला त्याला सर्वस्वी सुप्रीम कोर्ट जबाबदार. शासनाने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज असून जर हस्तक्षेप केला नाही तर लोकांनी कायदा हातात घेतल्यास परिणाम भयंकर होतील आणि त्यास शासनच जबाबदार असेल असा इशारा देखील आंबेडकर यांनी दिला.

You might also like
Comments
Loading...