देशभरात हिंदू धर्माला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र रचलं जात आहे : मोहन भागवत

mohan-bhagwat

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठा आरोप केला आहे. गोरक्षेच्या नावावर देशात ठिकठिकाणी होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटना या हिंदू धर्म आणि संस्कृतीला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे अस भागवत यांनी म्हटले आहे.

मोहन भागवत यांनी देशभरात हिंदू धर्माला आणि संस्कृतीला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र रचलं जात आहे. मॉब लिंचिंगच्या नावाखाली समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम सुरु आहे. गोरक्षेच्या नावाखाली अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना होत आहेत. काही राज्यात तर एक योजनेद्वारे धर्म परिवर्तन केलं जात आहे. देशात आज जी परिस्थिती आहे ती पाहता संघाच्या सर्व प्रचारकांनी सतर्क राहणं गरजेचे आहे अस विधान केले आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी विविध जातीपंतातील लोकांना एकत्र आणत समाजात निर्माण होणारं भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे निश्चितच सामाजिक स्तरावर समस्या सोडविण्यासाठी मदत होईल असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला.