fbpx

मोहन भागवत म्हणतात…तर आपली मुले हनुमानाला मंकी गॉड म्हणतील

mohan-bhagwat

टीम महाराष्ट्र देशा :  भारतातील शिक्षणामध्ये इंग्रजीचा वाढता प्रभाव पाहता सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक मोठ विधान केले आहे. इंग्रजी भाषेचा प्रभाव असाच सुरू राहिला तर भविष्यात आपली लहान मुले गणपतीला एलिफैंट गॉड व हनुमानाला मंकी गॉड म्हणतील अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्या मुलांना इंग्रजी नव्हे तर संस्कृत माधमातून शिक्षण द्यायला व्हावे अस मोहन भागवत म्हणाले आहेत.

मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत महाविद्यालयात संस्कृत भाषेबद्दलचे महत्त्व सांगितले. संस्कृत भाषा ही विस्तारलेली भाषा असून आदिवासी ते देशाच्या अनेक भाषांमध्ये संस्कृत भाषेचे ३० टक्के शब्दांचा वापर होतो. संस्कृत भाषा जगातील अनेक विद्यापीठात शिकवला जातो, आपल्याकडेही हजारो विद्यार्थी संस्कृत भाषा निवडतात कारण संस्कृत भाषेच्या परीक्षेत जास्त गुण प्राप्त होतात. त्यामुळे इंग्रजीऐवजी विद्यार्थ्यांनी संस्कृतकडे जास्त लक्ष द्यायला हवे.

दरम्यान, मोहन भागवत यांनी पुढे बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. तसेच त्यांना संस्कृत भाषा न शिकल्याची खंत होती असही वक्तव्य केले आहे.