‘मोदी है तो मुमकिन है’; कलम ३७० वरून मोहन भागवतांनी थोपटली मोदींची पाठ

mohan-bhagwat

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा म्हणून दिलेले कलम ३७० मोदी सरकारने हटवले आहे. मात्र हे कलम हटवताना जम्मू काश्मीर खोऱ्यात कोणत्याही प्रकारची निदर्शने किंवा हिंसा होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष काळजी घेण्यात आली होती. या सर्व प्रकरणावरून मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठ थोपटली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘देशातील लोक म्हणतात ‘मोदी है तो मुमकिन है,’ यात तथ्यच आहे. कलम ३७० हटविण्यासंदर्भात नागरिकांची इच्छाशक्ती प्रबळ होती, त्यामुळेच सत्तेवर बसलेल्या धुरिणांना तसे काम करण्याची शक्ती मिळाली. देशाचे स्वातंत्र्य जसे असावे, असे आपल्याला वाटत होते त्याचा अनुभव आता येतो आहेअस विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना ‘सद्य:स्थितीत देशाच्या नेतृत्वात जी संकल्पशक्ती आहे तिला समाजाच्या इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. यातूनच जनतेमध्ये विश्वास निर्माण होतो. ‘यस व्ही कॅन’चा भाव उत्पन्न होतो. देश महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून महासत्ता झाल्यानंतरही देशातील प्रत्येक घटकाची ओळख भारतात जपली जाईल. तसेच भारत जगातील इतर राष्ट्रांवर दबाव न बनवता त्यांची सुरक्षा करेल असंही मत भागवत यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, आता जम्मू काश्मीरमध्ये आता परिस्थिती निवळली आहे. त्यामुळे या भागातील शाळा आणि कॉलेज सोमवार पासून सुरु होणार आहेत. तर सरकारी कार्यालये, सचिवालय शुक्रवारपासून कामकाजाला सुरुवात केली आहे. कलम ३७० हटविल्यानंतर सप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती मात्र या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.