सरसंघचालकांना ध्वजारोहण करण्यापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली

तिरुअनंतपुरम : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यापासून रोखण्यासाठी शाळेला नोटीस पाठवणारे पलक्कडचे जिल्हाधिकारी पी. मेरीकुट्टी यांची बदली करण्यात आली आहे. केरळच्या पलक्कड येथील एका सरकारी शाळेत सरसंघचालक मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र शाळेतील शिक्षक किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीने हे ध्वजारोहण करावे, अशी नोटीस जिल्हाधिकारी पी. मेरीकुट्टी यांनी काढली होती. हा आदेश धुडकावून लावत भागवत यांनी ध्वजारोहण केले होते. दरम्यान, या बदलीचा आणि मोहन भागवत यांना ध्वजारोहणापासून रोखल्याच्या घटनेचा संबंध नाही. एकूण ५ जिल्हाधिका-यांची बदली नियमानुसार करण्यात आली असून त्यात मेरीकुट्टी यांचाही समावेश आहे, असे सांगण्यात येत आहे. मेरीकुट्टी यांची पंचायत संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी सुरेश बाबु हे पदभार स्वीकारणार आहेत.

You might also like
Comments
Loading...