मोहम्मद शमीच्या घरात घुसून धिंगाणा घालणाऱ्या हसीन जहाँला अटक

mohammad shami and haseen jahan

टीम महाराष्ट्र देशा- भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांची पत्नी हसीन जहाँ हिला अमरोहा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. मोहम्मद शमीच्या घरात घुसून त्याच्या आईशी वादावादी केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मोहमद्द शामीची पत्नी हसीन जहाँ मुलीसह रविवारी सायंकाळी सासरी सहसपूर अलीनगरला घरी पोहचली. हसीन घरी पोहचताच सासू आणि दीर यांच्यासोबत तिचे शाब्दिक भांडण झाले. यानंतर शमीच्या आईनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. जबरदस्तीने घरात घुसून मला घराबाहेर काढल्याचा आरोप हसीनवर केला. पोलिसांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. वाद मिटण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे पोलिसांनी तेथून हसीनला घेऊन गेले. सध्या हसीन जहाँवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मी सुद्धा एक मुलगी आहे, ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ हे सरकारचं धोरण आहे. योगी आदित्यनाथ सरकार, मोदी सरकार याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप हसीनने केला.हसीन जहां एवढ्यावरच थांबली नाही तर तीने थेट पोलिसांवर देखील आरोप केले आहेत. मोहम्मद शमीचे बड्या हस्तींसोबत संपर्क आहे, शिवाय पैशामुळे उत्तर प्रदेश पोलीस आपल्याला त्रास देत आहे, असं हसीनने म्हटलं.