मोहम्मद शमीने वडिलांच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाला.

शमी

नवी दिल्ली : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वडिलांच्या आठवणीने भावुक झाला आहे. शमीच्या वडिलांचं देहांत होऊन चार वर्ष होत आहेत. नुकतीच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करुन शमीने वडिलांची आठवण जागवली आहे.

शमीने आपल्या वडिलांच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये मी तुमची खूप आठवण करतो, कधी कधी तर तुमच्या आठवणीने माझ्या डोळ्यांत अश्रू येतात, असं मोहम्मद शमीने आपल्या पोस्ट म्हटलंय.

‘बाबा तुम्ही जाऊन आज वर्ष पूर्ण होतायत. खरंच मी तुम्हाला एकदा पाहू शकलो असतो तर… परंतु मला हे माहितीय की हे अशक्य आहे. माझ्या अश्रूंची किंमत तुम्हाला चांगलीच माहिती आहे. तुम्ही मला रडू देणार नाही, हे ही मला माहिती. मी प्रार्थना करतो ईश्वराने मला शक्ती द्यावी जशी तुम्ही मला दिली…’, अशा भावनिक शब्दात त्याने वडिलांच्या आठवणींना उजाळा दिलाय.

मी तुमचा मुलगा आहे याचा मला कायम अभिमान आणि गर्व वाटायचा. पप्पा मला तुमची खूप आठवण येतीय… असं म्हणत भावविवश होऊन शमीने इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. शमीच्या पोस्टनंतर त्याच्या शमीच्या चाहत्यांनी त्याचं सांत्वन केलंय.

महत्वाच्या बातम्या