जादुई आवाजाचा ‘हीरो’ मोहम्मद रफी यांना गुगलची खास डूडल द्वारे सलामी

mohammad rafi doodle on google

टीम महाराष्ट्र देशा : ज्याने आपल्या जादुई आवाजाने अवघ्या जगाला आपलस केल ते मोहम्मद रफी. रफीसाहब यांचा आज 93 वा जन्मदिवस आहे. या विशेष दिवसाच औचित्य साधत गूगल खास डूडल द्वारे मोहम्मद रफी यांना सलाम केला आहे.

रफी साहब यांचा गायकीचा प्रवास 

Loading...

जागतिक दर्जाच्या या गायकाला आपल्या गायिकीची प्रेरणा मिळाली, ती एका फकिराकडून. रफीसाहब यांच्या मोठ्या भावाचे दुकान होते. या दुकानातच लहान रफी आपली वेळ घालवत असे. यावेळी त्‍यांच्या भावाच्या दुकानात एक फकीय येत असे. फकीर जेव्‍हा गाणे म्‍हणत शहरातून फिरत असे तेव्‍हा मोहम्‍मद रफी त्‍याचा पाठलाग करत त्याच्या गाण्याची नक्‍कल करीत होते. फिरून  ते जेव्‍हा पुन्‍हा घरी येत तेव्‍हा त्या फकिराची ते कुटुंबियांनाही नक्‍कल करून  दाखवत. एक दिवस भावाच्या दुकानात गिर्‍हाईकांसमोर फकिराची नक्‍कल करून दाखवत असताना त्‍यांच्या भावाने त्‍यांच्यातील हे गाण्याचे वेड ओळखून त्‍यांना प्रेरणा दिली आणि त्यांना संगीत शिक्षणासाठी लाहोरमध्ये ठेवण्यात आले. मोहम्‍मद रफी यांच्या भावाने त्‍यांना लाहोरमध्ये संगीत शिक्षणासाठी उस्‍ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडे ठेवले. याबरोबरच त्‍यांना गुलाम अलीखान यांच्याकडे भारतीय शास्‍त्रीय संगीत शिकले.

रफीसाहब यांनी वयाच्या तेराव्‍या वर्षी आपले पहिले गीत रसिकांसमोर सादर केले. यावेळी रसिकांमध्ये बसलेले संगीतकार श्याम सुंदर यांनी त्‍यांनी मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले. श्याम सुंदर यांचे संगीत असलेल्या पंजाबी चित्रपट गुल बलोचसाठी ‘सोनिये नी हिरीये’ हे पहिले गीत झीनत बेगम यांच्यासोबत त्‍यांनी गायिले. १९४४ मध्ये नौशाद यांच्यासोबत पहिले हिंदी गीत ‘हिंदुस्‍थान के हम पहले आप के लिए गाया’ हे गीत त्‍यांनी गायिले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील