मराठा आरक्षण : सोलापुरातील मोहोळचे आमदार रमेश कदम यांचा राजीनामा  

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात वणवा पेटला असताना आता मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. आमदार रमेश कदम यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे.  रमेश कदम सोलापुरातील मोहोळचे आमदार आहेत.

मराठा आरक्षण : अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत कोणी कोणी राजीनामा दिला

  • कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
  • नाशिक मधील देवळा- चांदवड मतदार संघातील आमदार डॉ राहुल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी आज आमदारकीचा राजीनामा मराठा क्रांती समाजच्या समन्वयकांकडे सुपूर्द केला.
  • पंढरपुर-मंगळवेढा मतदार संघातील आमदार भारत भालके यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
You might also like
Comments
Loading...