‘गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींचा कार्यकाळ म्हणजे देशावरील काळा डाग’

Mayawati resigns from Rajya Sabha

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरु असून एकमेकांची उनीधुनी काढली जात आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यामध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ म्हणजे केवळ भाजपवरचा नव्हे तर देशावरील काळा डाग असल्याची टीका  मायावती यांनी बुधवारी केली.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून मायावती यांच्या कार्यकाळापेक्षा आपण जास्तवेळ गुजरातचे मुख्यमंत्री होतो, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. या टीकेला प्रत्युत्तर देताना मायावती म्हणाल्या, ज्यावेळी उत्तर प्रदेशात आमचे यांचे शासन होते. त्यावेळी उत्तर प्रदेश हिंसाचार आणि एकाधिकारशाहीमुक्त होता. पंतप्रधान जरी आमच्या पक्षाला ‘बहेनजी की संपत्ती पार्टी’ म्हणून हिणवत असले, तरी आम्ही सरकारपासून काहीही लपवलेले नाही. आम्हाला जे काही मिळाले आहे ते आमच्या शुभेच्छूकांनीच दिले असल्याचा दावा त्यांनी केला.Loading…
Loading...