मोदींच्या भाषणांची पातळी खूप घसरली; यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते : आंबेडकर

Prakash ambedkar

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींची जीभ घसरते आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची पातळी खूप घसरली आहे. यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, अशा व्यक्तीला जनतेने पंतप्रधान करू नये,’ तसेच भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येणार नाही. लोकसभा निवडणुकांनंतर एच.डी. देवेगौडा हे पंतप्रधान होतील. या विधानाचीदेखील त्यांनी पुनरावृत्ती केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांच्याकडून नरेंद्र मोदींवर राफेल घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. तर मोदी यांनी पलटवार करत राजीव गांधी यांचा जीवनप्रवास भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात संपल्याची टीका केली होती. त्यामुळे आंबेडकर यांनी मोदींवर टीका केल्याचे दिसत आहे.