मोदींचा लघुपट शाळेत दाखवाच ; राज्य सरकारचा तुघलकी फतवा

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘चलो जीते हैं’ हा लघुपट राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवण्यात येणार आहे. शाळांमध्ये लघुपट दाखवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. जिल्हाप्रमुख, शिक्षणाधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षकांना यासंबंधीचे तसे आदेशच दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता शिक्षकांनी यावर आक्षेप नोंदवल्यानंतर, अशा कोणत्याही सूचना शाळांना आमच्याकडून दिल्या गेलेल्या नाहीत, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

18 सप्टेंबरला  elearning.parthinfotech.in या संकेतस्थळावर हा लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत शाळांमध्ये हा लघुपट दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक एमबीपीएस इंटरनेट स्पीड हवा, सर्व शाळांनी या लघुपटाच्या प्रक्षेपणासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटरची सोय करायची आहे, असेही शाळांना सांगण्यात आले आहे.

मंगेश हडवळे दिग्दर्शित ‘चलो जीते हैं’ लघुपट 32 मिनिटांचा आहे. हा लघुपट जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानेही पाहिला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तो दाखवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्य निर्माण होणार नाही – मुख्यमंत्री

आरएसएस सोडून सर्व कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबा, जे तक्रार करतील त्यांना गोळ्या घाला – राहुल गांधी