प्रचारासाठी मोदींचा हटके फंडा केला थेट ‘सी प्लेन’ मधून प्रवास

sea-plane

टीम महाराष्ट्र देशां: गुजरात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे प्रचार आज संध्याकाळी संपणार आहेत. यात विशेष म्हणजे चक्क नरेंद्र मोदींनी सी प्लेन मधून प्रवास केला आहे. N181KQ या सी-प्लेनने प्रवास करुन येथील अंबाजी मंदिराला ते भेट देणार आहेत. भारतातील सी-प्लेनचा हा पहिलाच प्रवास असून पंतप्रधान मोदी सी-प्लेनने प्रवास करणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

मोदी सी प्लेननं अहमदाबादच्या साबरमती नदीत उतरले तिथून ते मेहसाना जिल्ह्यातील धारोई धरणात पोहचले. त्यानंतर ते अंबाजी मंदिरात दर्शन घेण्यासाठी रवाना झाले आणि पुन्हा त्याच मार्गानं परत अहमदाबादला परततील.