पाच राज्यातील अपयशानंतर मोदींचा मास्टरस्ट्रोक ; सवर्णांना आरक्षण.

टीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यातील पराभवाचा फटका बसल्यानंतर मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. सवर्णातील आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्यांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यापूर्वी देशात सर्वांचे मिळून ५० टक्के आरक्षणाची परिसीमा आहे, त्यात १० टक्के वाढवण्याचा निर्णय सरकारने आजच्या कॅबिनेट बैठीकीत घेतला आहे.त्यामुळे उत्तर भारतात सवर्णांनी केलेल्या आंदोलनाचा हा विजय मानला जात आहे.उत्तर भारतासह देशभरात आरक्षणाच्या मुद्द्यावरून असंतोषाची लाट पसरली होती.त्याचा फटका मोदी सरकारला पाच राज्याचा निवडणुकीतही बसला.

येणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे.त्यामुळे काही अंशी सरकार विरूद्धचा रोष सवर्णांमधील कमी होणार आहे.आणि याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत सरकारला निच्छित होणार आहे.अनेक दिवसापासून आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी होत होती.आता या निर्णयाची अंमलबजावणी सरकार कशा प्रकारे करते हे बघावे लागणार आहे, त्यासोबत महाराष्ट्रात होत असलेल्या मेगा भरतीत याचा विचार केला जाणार कि नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

Loading...