मोदी आडनाव भ्रष्टाचाराचं दुसरं नाव- राहुल गांधी

Modi vs rahul gandhi

नवी दिल्ली: कॉंग्रेसने भाजपला निवडणुकांमध्ये मात देण्यासाठी जोरदार तयारी केली. पक्षाच्या महाअधिवेशना, दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. मोदी आडनाव भ्रष्टाचाराचं दुसरं नाव झालंय, काँग्रेस देशाचा आवाज तर भाजप संघाचा आवाज असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

काय म्हणाले राहुल गांधी?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी आणि ललित मोदींसारख्यांचं भलं केलं. अमित शाह यांच्या मुलाला गडगंज केलं. पण सामान्य माणसाकडे दुर्लक्ष केलं,” काँग्रेसनं कधीही द्वेषाचं राजकारण केलं नाही, भाजप सत्तेसाठी काहीही करु शकतं आणि काँग्रेस जनतेसाठी काहीही करु शकतं, असे राहुल गांधी म्हणाले

राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्यावर पण निशाणा साधला ”एका हत्येच्या आरोपीला पक्षाचे अध्यक्ष बनवल, आम्हाला खरे बोलण्यापासून कोणीही आडवू शकत नाही. भाजपाला सत्तेची नशा चढलेय, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

Loading...