‘भाजपच्या यशामागे मोदींचा चेहरा, तेच भाजपचे नेते’, राऊतांनी कौतूक केल्याने भुवया उंचावल्या

नाशिक : शिवसेना नेते संजय राऊत हे नेहमी ‘सामना’ आणि विविध माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकास्त्र सोडतात. पण आज त्यांनी नाशिक येथे सर्वांच्या भुवया उंचावणारे वक्तव्य केले आहे. ‘नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात भाजपाला यश मिळालं आहे हे नाकारता येणार नाही’ असं राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत पक्षबांधणीच्या निमित्ताने पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं.

संजय राऊत यांनी मोदी यांचे कौतूक करताना कोपरखळीही मारली आहे. ‘पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांनी राजकीय प्रचार करू नये, पश्चिम बंगालमध्ये जे झाले ते चुकीचे होते. पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करता कामा नये, मग ते मनमोहन सिंग असतील किंवा नरेंद्र मोदी असतील. बाळासाहेब ठाकरेही हीच भूमिका मांडायचे. तसेच भाजपाला जे यश मिळत आहे ते मोदींच्या चेहऱ्यामुळेच मिळत आहे. मोदी हेच भाजपाचे नेते आहेत, असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटलांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान केले होते. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.त्यांनी चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. मात्र, वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो असा टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या

IMP