मोदींची हुकुमशाही हिटलरपेक्षाही वरचढ – सुशीलकुमार शिंदे

sushilkumar shinde

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सोलापूर दौर्यावर होते त्यावेळी सरकार विरोधात निदर्शने करणाऱ्या कॉंग्रेस युवकांना पोलिसांनी मारहाण केली. या घटनेबाबत कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या ट्वीटर वरून सरकार वर टीका केली होती तर आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही लोकशाही आहे की हुकूमशाही? हिटलरही असा वागला नव्हता, अशा शब्दात घणाघाती टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच सोलापूर दौरा केला.त्या दौऱ्यात त्यांच्या हस्ते अनेक विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले होते.त्यावेळी मोदींनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली होती.आता त्याला माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले,सत्तेत आल्यानंतर 100 दिवसात धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र पंतप्रधान तीन वेळा सोलापुरात येऊनही अद्याप धनगर आरक्षण का दिलं नाही? असा सवालही त्यांनी यावेळी मोदींना केला. मोदींनी आता भूमीपूजने करून लोकांची फसवणूक करण्याची हौस भागवून घ्यावी. ‘बाजारात विकासाच्या तुरी आणि मोदीजी पोकळ बाता मारी!’, अशा शेलक्या शब्दात शिंदे यांनी मोदींवर टीका केली.

योग्य ठिकाणी बाप थांबला तिथच पोरं पुढे जाऊ शकतात – सत्यजीत तांबे