fbpx

मोदींनी मागवले महाराष्ट्रातील भाजप खासदारांचे प्रगतीपुस्तक

टीम महाराष्ट्र देशा– येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोणाला खासदारकीचे तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही, हे ठरवण्यासाठी भाजपने महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक संसदेच्या पटल कार्यालय म्हणजेच टेबल ऑफिसकडून मागवले आहे. त्यामुळे कोणत्या खासदाराला पक्षाचे पुन्हा नेतृत्व करता येईल आणि कोणता खासदार गेल्या ५ वर्षात कार्यकुशल राहिला याचा देखील उलघडा होणार आहे.

सदर प्रगतीपुस्तक पाहून पंतप्रधान कार्यालय त्यावर एक अहवाल तयार करणार असून त्यामध्ये खासदारांची संसदेतील उपस्थिती, विचारलेल्या प्रश्नांचा अहवाल आणि संसदीय बैठकीतील उपस्थिती याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाद्वारे घेण्यात येणार आहे. तयार करण्यात येणाऱ्या अहवालानुसार येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला कोणत्या खासदाराला पुन्हा तिकीट द्याचे हे ठरवण्यात येणार आहे.

पंतप्रधान कार्यलयाच्या या उपक्रमाला संसदीय पटल कार्यालयाने दुजोरा दिला असून येत्या 10 दिवसात सर्व खासदारांचे रिपोर्ट संसदीय पटल कार्यालय हे पंतप्रधान कार्यालयाकडे सादर करणार आहे.