राम मंदिराच्या बांधकामावर असणार ‘मोदींची’ नजर, जवळच्या व्यक्तीची केली निवड

टीम महाराष्ट्र देशा – अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिराच्या बांधणीचा महत्वाचा टप्पा आज पार पडला. राम मंदिर उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीत सदस्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले.

राम मंदिर ट्रस्टमधील बांधकाम समितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जवळच्या अधिकार्याची नियुक्ती केली आहे. हे अधिकारी दुसरे कोणी नसून पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र आहेत.

Loading...

मिश्र हे मोदींच्या जवळचे अधिकारी मानले जातात. यामुळे राम मंदिराच्या बांधकामावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारीक नजर असणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी मोदींनी राजमंदिराच्या उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अदेशानुसार ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना केली.

आज ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची अध्यक्ष तर चंपत राय यांची सचिवपदी निवड करण्यात आली. पुण्याचे स्वामी गोविंद देव गिरी यांची ट्रस्टच्या खजिनदारपदी निवड करण्यात आली.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका