पंतप्रधान मोदींचा बुडबुडा फुटला ; उमर खालिद

सरकारविरोधात युवा हुंकार रॅली ऐवजी हुंकार सभा

नवी दिल्ली : गुजरातचे युवा दलित नेता, आमदार जिग्नेश मेवाणी मोदी सरकारच्या विरोधात ‘युवा हुंकार रॅली’ चे आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आयोजकांनी रस्त्यावरच खुर्च्या टाकून सरकारविरोधात हुंकार सभा घेतली.

उमर खालिद म्हणाला, पंतप्रधान मोदींचा बुडबुडा आता फुटला असून आम्ही देशभरात त्यांच्याविरोधात रान पेटवू. मेवानीं म्हणाले, सरकार आमचा आवाज दाबू पाहत असून जनतेमधून निवडून आलेल्या माझ्यासारख्या आमदाराला रॅली काढण्यास परवानगी नाकारणे, हा लोकशाहीचा अपमान आहे.

 हुंकार रॅली हि संसद मार्गापासून ते पंतप्रधान निवासस्थान अशी जाणार होती. मात्र २६ जानेवारीच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे आम्हाला टार्गेट केले जात असून हे लज्जास्पद आहे. असे मत जिग्नेश मेवानी यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आयोजकांनी रस्त्यावरच खुर्च्या टाकून सरकारविरोधात युवा हुंकार रॅली ऐवजी हुंकार सभा घेण्यात आली. हुंकार सभेला देशभरातले विद्यार्थी आणि उमर खालिद देखील उपस्थित होता.