fbpx

‘मोदींची वर्तणुक नव्या नवरी सारखी’

टीम महाराष्ट्र देशा- नवी नवरी घरात आल्यानंतर काम कमी आणि बांगड्याचा आवाज जास्त करते, जेणेकरून शेजाऱ्यांना वाटेल की नवीन सुनबाई खूप काम करतेय. मोदींची वर्तणुकही नव्या नवरी सारखीच आहे, काम कमी गवगवा जास्त आहे, असे म्हणत विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

पुणे जिल्ह्यात मंचर येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते. यावेळी मुंडे म्हणाले की, पाच राज्यांच्या निवडणुकींच्या निकालानं भाजपाचे डोळे पांढरे झाले आहेत. दिल्लीत बसलेल्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा ट्रेलर दिसला आहे. ‘मेरा देश बदल रहा है’ ही जाहिरात दिसेनाशी झाली आहे.

नवी नवरी घरात आल्यानंतर काम कमी आणि बांगड्याचा आवाज जास्त करते, जेणेकरून शेजाऱ्यांना वाटेल की नवीन सुनबाई खूप काम करतेय. मोदींची वर्तणुकही नव्या नवरी सारखीच आहे, काम कमी गवगवा जास्त आहे, असे मुंडे यावेळी म्हणाले.