fbpx

‘#ModiGoBack कॅम्पेनची सुरूवात भाजपाच्या गोटातूनच’

टीम महाराष्ट्र देशा – #ModiGoBack कॅम्पेनची सुरूवात भाजपाच्या गोटातूनच तर सुरू झाली नाही ना? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

मुंडे यांनी आपल्या ट्विटवरून गोव्यात होणाऱ्या एका उद्घाटनाची जाहिरात शेअर केली आहे. त्यामध्ये नितीन गडकरी आणि मनोहर पर्रीकर यांचाच फोटो आहे. एरवी प्रत्येक जाहिरातीत नरेंद्र मोदींचा दिसणारा चेहरा मात्र या जाहिरातीमध्ये दिसत नाही. त्यामुळे मुंडे यांनी #ModiGoBack कॅम्पेनची सुरूवात भाजपाच्या गोटातूनच तर सुरू झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

मुंडे यांनी त्यांच्या ट्विटवरून ट्विट केले आहे की, ‘#ModiGoBack कॅम्पेनची सुरूवात भाजपाच्या गोटातूनच तर सुरू झाली नाही ना? मोदी भाजपच्या डोळ्यात तर खुपत नाही ना? RSSला मोदी जड तर झाले नाही ना? नाही म्हणजे, एरवी प्रत्येक जाहिरातीत झळकणाऱ्या @narendramodiचा चेहरा, गोव्यातील विकासकामांच्या जाहिरातीत दिसला नाही म्हणून प्रश्न पडत आहेत.’