…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी

rahul gandhi

टीम महाराष्ट्र देशा – तीन राज्यात सत्ता मिळाल्यानंतर कॉंग्रेसने मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यातील शेतकरी कर्जमाफी केली आहे. त्यानंतर कॉंग्रेस आता देशभरातील शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झाली आहे. संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी शेतकरी कर्जमाफीवर बोलताना म्हणाले कि जोपर्यंत देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत पंतप्रधान मोदींना झोपू देणार नाही.

त्यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे असही ते त्यावेळी म्हणाले. आतापर्यंत मोदींनी शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्जही माफ केलेलं नाही. त्यामुळे जोपर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही,’ असा इशाराच राहुल गांधी यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीवर कॉंग्रेस आक्रमक झाली आहे.