पुढील निवडणुकीनंतर मोदींना सत्ता गमवावी लागणार – अॅड. जेठमलानी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर बसवून घोड चूक केली

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर बसवून घोड चूक केली. पुढील निवडणुकीनंतर मोदींना सत्ता गमवावी लागणार. असे ज्येष्ठ विधीज्ञ व खासदार अॅड. राम जेठमलानी यांनी स्पष्ट केले. पुणे येथील सिम्बॉयसिस लॉ स्कूलतर्फे विधी दिनाच्या पार्श्वभूमीवर न्या. यशवंतराव चंद्रचूड स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. जेठमलानी यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलतांना जेठमलानी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

काय म्हणाले अॅड. जेठमलानी?

‘जनतेने नरेंद्र मोदींना सत्तेवर बसवलं खरं पण ती घोडचूक होती हे आता जनतेला कळलं आहे. मात्र पुढील निवडणुकीनंतर मोदींचा नुसता पायउतारच होणार नाही तर कदाचित ते देशच सोडून जातील’,

‘मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जेव्हा घोषित करण्यात आले तेव्हा तेच सत्तेवर यावेत अशीच सगळ्यांची इच्छा होती. त्यासाठी काहीजणांनी प्रयत्नही केले. पण आता मात्र आपण ती घोडचूक केली असेच जनतेला वाटत आहे’, पुढील निवडणुकीनंतर मोदींना सत्ता गमवावी लागणार असून त्यानंतर ते देशाबाहेर निघून जातील. नंतर बंगालची वाघीणच देशाची पंतप्रधान बनेल असे भाकितही जेठमलानी यांनी केले आहे.

You might also like
Comments
Loading...